आज पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण; ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं;
सोने आणि चांदीमध्ये सातत्याने घसरण होत असून गुंतवणूकदार हवालदील बनले आहेत. आज सकाळच्या सत्रात पुण्यामध्ये सोन्याच्या दरात 1600 रुपयांची घसरण तर चांदीच्या दरात 700 रुपयांची घसरण झाल्याचं पहायला मिळालंय.
आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर्सच्या किंमतीत वाढ झाल्याने सोन्याच्या किंमतीत घट झाल्याचं पहायला मिळतंय. मुंबई आणि पुण्यात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 43,760 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 44,760 रुपये इतका आहे.
good returns या वेबसाईटनुसार आज शुक्रवारी मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 43760 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 44760 रुपये झाला आहे. त्यात गुरुवारच्या तुलनेत 160 रुपयांची घसरण झाली. दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 43850 रुपये झाला आहे. 24 कॅरेटसाठी सोन्याचा भाव 47840 रुपये आहे. त्यात 300 रुपयांची घसरण झाली.
मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.
वाचा :OnePlus 9R पुढील महिन्यात होणार लॉन्च; जाणून घ्या किंमतीसह खासियत
युरोप व भारतात कोव्हिड-19 चे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने स्पॉट गोल्डचे दर 0.4 टक्क्यांनी वाढले व ते 1734.2 डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. अमेरिकी ट्रेझरी उत्पन्नात सहजता आल्याने मौल्यवान धातूच्या मागणीत आणखी वाढ झाली.
भारत आणि युरोपात संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने नव्या लॉकडाऊनची शक्यता आहे. यामुळे बाजारातील जोखिमीच्या व्यवहारांवर परिणाम झाला आणि सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याला आधार मिळाला असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
दरम्यान, ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या दरांनी प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास 11 हजारांहून जास्त रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय.
[sc name=”adg”]